‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्स’ची स्टार आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेहने सोशल मीडियावर ट्रोल झाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिच्यावर टीका होत आहे. सोहेल खानपासून विभक्त झाल्यानंतर ती आता ‘बॉलिवूड पत्नी’ राहिली नाही, असे म्हणत एका युजरने तिची खिल्ली उडवली आहे. विशेष म्हणजे घटस्फोटानंतर सीमाने तिचे नावही बदलले आहे.

सीमा सजदेह आणि सोहेल खान यांनी या वर्षाच्या सुरुवातीला घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता आणि त्यांचे २४ वर्षांचे वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. हे दोघंही निर्वाण आणि योहान या दोन मुलांचे पालक आहेत. नेटफ्लिक्स मालिका ‘फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज २’ च्या पहिल्या एपिसोडमध्ये सीमा तिच्या घराच्या मुख्य गेटवरून ‘खान’ असं लिहिलेली नेमप्लेट काढताना दिसली होती. त्या जागी तिने ‘सीमा, निर्वाण, योहान’ अशी नेमप्लेट लावली.
आणखी वाचा-छेडछाडीचं प्रकरण भोवलं; केआरकेला एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अटक

सीमा सजदेहने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोशल मीडियावर आलेल्या आक्षेपार्ह कमेंटवर उघडपणे भाष्य केलं. एका सोशल मीडिया युजरने सीमाला, “आता बॉलिवूडची पत्नी नसताना या मालिकेचा भाग का आहेस? असा प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना सीमा इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मला माहित नव्हते की महिलांची ओळख त्यांचा पती आणि त्यांच्या आडनावांवरून केली जाते. हीच त्याची एकमेव ओळख आहे का?”

आणखी वाचा- “मला मुली आवडतात…” सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सीमा सजदेहचं वक्तव्य चर्चेत

घटस्फोटाबद्दल बोलताना सीमाने यापूर्वी ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, “जर तुम्हाला माहिती आहे की इथे अंधारी खोल दरी आहे ज्यात तुम्ही पडू शकता तर अर्थातच तुम्हाला दुसऱ्या बाजूला राहायला आवडेल. मी असाच विचार करते आणि यामुळेच मला पुढे जाता येते.” सीमा पुढे म्हणाली, “मी माझ्या आयुष्याकडे एका सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते. माझ्या आयुष्यात आता पूर्वीप्रमाणे नकारात्मकता राहिलेली नाही.”

Story img Loader