Selena Gomez Engagement : ‘काम डाउन’, ‘पिपल यू नो’, ‘व्हू सेस’, ‘लव्ह ओन’, ‘सिंगल सून’, ‘बॅक टू यू’, ‘स्लो डाउन’, ‘गॉड फॉर यू’, ‘सेम ओल्ड लव्ह’, ‘लूक अ‍ॅट हर नाउ’ असे अनेक सुपरहिट गाणी देणारी जगप्रसिद्ध गायिका सेलेना गोमेजने ( Selena Gomez ) तिच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे तिचा बॉयफ्रेंड बेनी ब्लॅन्कोबरोबर तिच्या साखरपुड्याची घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सेलेना तिची सुंदर हिऱ्याची अंगठी दाखवत आहे, ज्यामुळे तिचे चाहते भावूक झाले आहेत. सेलेना गोमेझने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती हिरवळीवर बसून तिच्या अंगठीकडे कौतुकाने पाहत आहे. शेवटच्या फोटोमध्ये बेनी ब्लॅन्को गोमेझच्या डोक्यावर किस करताना दिसत आहे. साखरपुड्याची घोषणा करताना सेलेनाने लिहिले, “फॉरएव्हर बिगिन्स नाऊ…”

हेही वाचा…भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी

यावर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन केले. ‘द व्हॅम्पायर डायरीज’ फेम अभिनेत्री नीना डोब्रेवने प्रतिक्रिया देत लिहिले, “येस्स !!! अभिनंदन!!!!! मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे!!!!” तर अमेरिकन रॅपर लिल नास एक्सने कमेंट केली, “ओएमएमजीजीजीजी कॉन्ग्रॅट्स्स्स अहहह.”

एका चाहत्याने लिहिले, “खूप सुंदर!!! अभिनंदन सुंदर स्त्री. तुम्हाला शुभेच्छा!” दुसऱ्या चाहत्याने लिहिले, “ओएमजी! अभिनंदन सेलेना! तुझ्यासाठी खूप आनंदी आहे.”

हेही वाचा…कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”

बेनी ब्लॅन्को हा गीतकार असून तो संगीत रेकॉर्डर आहे. बेनी ब्लॅन्को आणि सेलेना गोमेज या दोघांनी डिसेंबर २०२३ मध्ये ते एकमेकांना डेट करत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, काही मिडिया रिपोर्टनुसार त्यांनी नात्याची अधिकृतरित्या घोषणा करण्याच्या सहा महिन्यांपूर्वीच त्यांच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली होती. सेलेना गोमेज आणि ब्लॅन्कोने पहिल्यांदा २०१९ च्या ‘आय कांट गेट इनफ’ या गाण्यावर एकत्र काम केले होते , ज्यामध्ये तैनी आणि जे बल्विनसुद्धा होते. त्यानंतरही त्यांनी २०२३ च्या ‘सिंगल सून’ या गाण्यासाठी एकत्र काम केले आणि याच गाण्याच्या वेळी त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

हेही वाचा…मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ

‘पीपल मॅगझिन’ला दिलेल्या एका मुलाखतीत ब्लॅन्कोने त्याने सेलेनाला आपली ‘सर्वोत्कृष्ट मैत्रीण’ म्हटले होते. ब्लॅन्को म्हणाला होता, “मी तिच्याकडे बघतो तेव्हा… मला नेहमीच असं वाटतं की यापेक्षा चांगलं जग असू शकत नाही.” सेलेना गोमेझ अलीकडेच ‘एमिलिया पेरेझ’ या चित्रपटात दिसली होती, तसेच ती ‘डिस्ने+ हॉटस्टार’ वरील ‘ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग’ या शोमध्ये झळकली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selena gomez announces engagement to benny blanco with share images and post psg