अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची घोषणा केल्यानंतर प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सेलेना गोमेझ भावूक झाली. तिने आपल्या भावना एका इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे व्यक्त केल्या, मात्र नंतर ती स्टोरी तिने डिलीट केली.
या व्हिडीओमध्ये सेलेना काळ्या रंगाच्या पोशाखात आपल्या घरी असल्याचे दिसते. ती म्हणाली, “मला फक्त एवढंच सांगायचंय की मला खूप वाईट वाटतंय. माझ्या लोकांवर हल्ले होत आहेत – लहान मुलांवरही. मला हे समजत नाही. मला हे ऐकून खूप वाईट वाटतं, मी काही करू शकत नाही, पण मला काहीतरी करायचं आहे. मी यासाठी काहीतरी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन, हे मी वचन देते.”
याबरोबरच, तिने “I’m sorry” अशी कॅप्शन देत आणि मेक्सिकोच्या ध्वजाचा स्टिकरही या व्हिडीओवर लावला होता. तिचा हा व्हिडीओ तिने काही वेळातच डिलीट केला, पण तिच्या चाहत्यांच्या एका पेजने तो X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला. सेलेनाच्या भावनिक व्हिडीओत तिने मांडलेल्या मताचे अनेक चाहत्यांनी समर्थन केले, मात्र इंटरनेटवरील काही लोकांनी तिच्यावर टीका केली.
Selena Gomez bursts into tears over Donald Trump’s immigration law against Mexicans and Latinos in the US. pic.twitter.com/BuPidfBqFa
— Selena Gomez News (@SELENAT0RSARMY) January 27, 2025
एका युजरने लिहिले, “हे ट्रम्प यांचे फक्त मेक्सिकन आणि लॅटिन लोकांविरोधी धोरण नाही. हा अमेरिकेचा कायदा आहे, जो बेकायदेशीर मार्गाने देशात प्रवेश करणाऱ्यांविरोधात आहे.” दुसऱ्याने टिप्पणी केली, “माझे लोक? ती अमेरिकन आहे… तिचे लोक अमेरिकन नागरिक आहेत. जर तिला मेक्सिकोमध्ये राहायचं असेल, तर तिने खुशाल तिच्या लोकांमध्ये जाऊन राहावं !”. एका व्यक्तीने लिहिले, “फक्त काही विशिष्ट स्थलांतरितांबाबत सहानुभूती दाखवणे हे खोटे नाटक आहे.”

Her people
— Jenniferjoy175 (@RiverRatOG) January 28, 2025
She is an American…her "people" are they American Citizens
If she wants to be a Mexican …then go live amongst "your people"
तर आणखी एका युजरने प्रतिक्रिया दिली, “सर्व लोक तिचे लोक? माझे लोक म्हणजे माझे सहकारी अमेरिकन, मग ते कुठूनही आले असले तरी. त्यांनी कायदेशीर मार्गाने देशात प्रवेश करून शपथ घेतली आहे.” या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर सेलेना गोमेझने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे उत्तर दिले. ती म्हणाली, “लोकांप्रती सहानुभूती दाखवणं चुकीचं आहे का?” मात्र, तिची ही पोस्टही तिने काही वेळानंतर हटवली.
सेलेना गोमेझने स्थलांतरितांच्या मुद्द्यावर आपले मत मांडत आली आहे. २०१९ मध्ये तिने Living Undocumented नावाची नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी तयार केली होती, जी ट्रम्प प्रशासनाच्या काळात अमेरिकेत राहणाऱ्या आठ बेकायदेशीर स्थलांतरित कुटुंबांच्या संघर्षावर प्रकाश टाकते.