अमेरिकन गायिका सेलेना गोमेझ हिचे नाव आज जगभरात प्रसिद्ध असलेल्या गायकांच्या यादीत सामील आहे. भारतातही तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहत ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असलेलीही पहायला मिळते. पण आता नुकताच तिने तिच्या आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. ती नैसर्गिकरित्या कधीच आई होऊ शकणार नाही असे तिने सांगितले आहे.
सेलेना गोमेझ हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओत तिला असलेल्या एका आजारावर आजाराबद्दल माहिती देत त्यावर चालू असलेल्या औषधांमुळे ती कधीही आई होऊ शकणार नाही असे ती सांगत आहे. सेलेनाने २०२० मध्ये आपल्या या आजाराबद्दल खुलासा केला होता.
आणखी वाचा : “…तेव्हापासून मी प्रमुख भूमिकेसाठी ऑडिशन देणे बंद केले,” राजकुमार रावने सांगितला धक्कादायक अनुभव
सेलेना गोमेझने दोन वर्षापूर्वी इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान ती बोयपोलर डिसऑर्डर या आजाराशी सामना करत असल्याची माहिती दिली होती. बोयपोलर डिसऑर्डर हा एक मानसिक आजार आहे. त्यावेळी ती म्हणाली होती, “गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या समस्यांचा सामना केल्यानंतर मला लक्षात आलं की मला बायपोलर डिसऑर्डर हा आजार त्रस्त आहे. पण एकदा या आजाराबद्दल सर्व गोष्टी कळल्यानंतर मला याची भीती वाटणं बंद झालं. मला वाटतं की लोक उगाच अशा आजाराला घाबरतात.”
त्यानंतर सेलेना गोमेझने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिचे भविष्यातील वैयक्तिक आयुष्याबद्दलचे प्लॅन्स विचारण्यात आले. याचे उत्तर देताना ती म्हणाली, “मला निश्चितच मुलांना जन्म द्यायला आवडेल पण मी घेत असलेल्या औषधांमुळे हे माझ्यासाठी कदाचित धोक्याचं ठरू शकतं.” सेलेनाला वाटतं की जेव्हा ती आई बनण्याचा विचार करेल तेव्हा तिला नैसर्गिक पद्धतीने नाही तर अन्य वैद्यकीय पद्धतींच्या मदतीने तिच्या बाळाला जन्म द्यावा लागेल.”
हेही वाचा : प्रियांका चोप्राचा पती निक जोनस समलैंगिक? एक्स गर्लफ्रेंडने केला मोठा खुलासा
याआधी २०१४ साली तिचे किडनी ट्रान्सप्लांटही झाले होते. तिच्या एका खास मैत्रिणीने तिला किडनी दान केली होती. दरम्यान सेलेना आता ‘माय माईंड अँड मी’ ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित केली आहे. यात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनुभवलेल्या सुख दुःखांबद्दल भाष्य केलं आहे.