सई ताम्हणकर नेहमीच तिच्या बोल्ड आणि सेन्शुअस व्यक्तिमत्वासाठी सिनेसृष्टीत ओळखली जाते. संजय जाधवच्या ‘आगामी प्यार वाली लव्ह स्टोरी’ चित्रपटात ती स्वप्निल जोशीसोबत पडद्यावर झळकणार आहे. सई या चित्रपटात अॅक्शन अवतारात दिसणार आहे.

मुजतबा कमल यांच्याकडून सई मुष्ठियोद्धेचे शिक्षण घेत आहे. किक-बॉक्सिंगचा थोडं थोडे धडे गिरवले आहेत. बॉक्सिंग शिकण्याबद्दल विचारलं असता सई म्हणाली की, मला फीट राहायला आवडतं. हा केवळ एक खेळ नाही तर फिट राहण्याचा एक चांगला ऑप्शन आहे. आजकालची मुलं टीव्ही आणि कम्प्युटरमध्ये व्यस्त असतात. पण, तोच वेळ किक-बॉक्सिंगला दिला तर शारीरिक आणि मानसिकरित्या ते स्वत:ला तंदुरुस्त बनवू शकतात. ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०१४ ला प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensual sai tamhankar now in action avatar