हल्ली लोक मालिका आणि मोबाइलच्या इतके आहारी गेले आहेत, की त्यांचं आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं भान तर हरपलं आहेच, पण आपलं रोजचं जगणं आणि मालिका यांच्यातला फरकही त्यांना जाणवेनासा झाला आहे. विशेषत: गृहिणी असलेल्या स्त्रियांना! त्यांचं सगळं जगणंच जणू छोट्या पडद्यावरच्या या मालिकांभोवती फिरताना दिसतं. नातीगोती, आपली कर्तव्यं या सगळ्या सगळ्याचा विसर त्यांना पडू लागला आहे. यामुळेच विविध वाहिन्यांवर मालिकांचं रोजचं दळण त्यांना महत्त्वाचं वाटू लागलं आहे. त्यात त्या आपलं जगणं शोधू लागल्या आहेत. या सगळ्या प्रकारातलं वैय्यर्थ्य काही सजग, संवेदनशील कलावंतांना जाणवू लागलं आहे. त्यामुळे ते अधिक अर्थपूर्ण अशा नाटक, सिनेमा आणि ओटीटीवरच्या या दळणाला पर्याय शोधू लागले आहेत. परंतु तरीही घरबसल्या मनोरंजन हवं असणाऱ्यांना मालिकांच्या या दळणाशिवाय पर्याय नाही. आणि कमी श्रमांत घराघरांत पोहोचू पाहणाऱ्याया कलाकारांनाही हे पोटार्थी दळण दळण्यावाचून पर्याय नाही. याचं अत्यंत दाहक चित्रण अभिराम भडकमकर यांच्या ‘अॅट एनी कॉस्ट’ या कादंबरीत वाचायला मिळतं. आता भाऊ कदम अभिनित, केदार आनंद देसाई लिखित-दिग्दर्शित ‘सीरियल किलर’ हे याच विषयाला उपरोधिकपणे हात घालणारं नाटक रंगमंचावर आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा