सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सावित्री एक क्रांती’ ही हिंदी मालिका दूरदर्शनच्या किसान वाहिनीवर सुरु झाली आहे. २८ सप्टेंबरपासून सोमवार ते शुक्रवारी दररोज रात्री साडेआठ वाजता मालिका प्रसारित होणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
या मालिकेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा तसेच सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. धरिशा कल्याणी व प्रियांका पांचाळ या अनुक्रमे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत. कुलदीप दुबे, प्रिती गिडवाणी, विशाल भारद्वाज, दिप्ती भागवत, कविता वाधवा, अमित बहेल, शीश खान, रेश्मा गोखले, सोहम चौधरी हे कलाकार मालिकेत आहेत.
मालिकेची निर्मिती लहुशेट जाधव व हरिश सपकाळे यांनी केली असून दिग्दर्शन शिवदत्त शर्मा व जयदेव चक्रवर्ती यांचे आहे. मालिकेसाठी हरी नरके व नितीन आरेकर यांनी संशोधन सहाय्य केले आहे.
First published on: 20-09-2015 at 00:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serial on savitribai phule life