६ जानेवारीला प्रदर्शित; जोतिबा फु ले यांच्या भूमिकेत ओंकार गोवर्धन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रमाबाई रानडे, जिजामाता, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेचा इतिहास लिहिताना ज्यांचे नाव कायम अग्रस्थानी असते अशा सावित्रीबाई आणि जोतिराव फुले या दांपत्याच्या चरित्रावर मालिका येऊ घातली आहे.
आजवर मराठीत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, रमाबाई रानडे, जिजामाता, बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा अनेक थोर व्यक्तिरेखांवर मालिका आल्या.
महाराष्ट्राला स्त्री शिक्षण आणि समानतेचे धडे देणाऱ्या फुले दाम्पत्याची चरित्रगाथा ‘सोनी मराठी’ वाहिनी आता छोटय़ा पडद्यावर घेऊन येत आहे. ‘सावित्रीजोती’ असे या मालिकेचे नाव असेल. दशमी क्रिएशनची निर्मिती असलेली ही मालिका येत्या ६ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. सावित्रीबाई फु ले यांच्या भूमिकेत अभिनेत्री अश्विनी कासार दिसणार असून जोतिबा फु ले यांची भूमिका ओंकार गोवर्धन साकारणार आहे. मालिके चे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे असून नितीन वैद्य यांची निर्मिती आहे. मालिके तून मनोरंजनापलीकडे अभ्यासपूर्ण संहिता पोहचवण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक हरी नरके यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.
कथा, कादंबऱ्यांतून फु ले दाम्पत्याविषयी अनेकांनी वाचले असेल. परंतु चरित्रपटातून प्रथमच ही यशोगाथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही फक्त संघर्षांची कहाणी नसून त्या दोन व्यक्तींचे सहजीवन आणि त्यात जातीपातींच्या पलीकडे जाऊ न समाजासाठी के लेले नि:स्वार्थी काम दाखवण्याचा प्रयत्न आहे. ‘तो काळ प्रेक्षकांसमोर जिवंतपणे उभा करणे आव्हान आहे. त्यामुळे विविध तंत्रांच्या साहाय्याने त्या काळातील जीवन, फु ल्यांचे घर, तत्कालीन सामाजिक परिस्थिती अशा अनेक घटकांशी साधर्म्य साधण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न के ला आहे. यानिमित्ताने सावित्री आणि जोतिबांचे कार्य घराघरात पोहचवले जाईल,’ असा विश्वास मालिके चे निर्माते नितीन वैद्य यांनी व्यक्त के ला आहे.
महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक विकासात फुले दाम्पत्याचा मोठा वाटा आहे. स्त्री शिक्षण ही या कथेतली फक्त एक बाजू आहे. त्या पलीकडील आदर्श सहजीवन दाखवण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच मालिके चे नाव ‘सावित्रीजोती’ ठेवण्यात आले आहे. ज्या काळात स्त्रियांना कसलेच स्वातंत्र्य नव्हते. त्या काळात पत्नीला विचारात घेऊ न तिच्या सोबत चालणे ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. परंतु ते फु ल्यांनी के ले आणि त्यामुळेच समाजात मोठे परिवर्तन घडून आले. त्या सर्व पाश्र्वभूमीची आणि त्यांच्या सहजीवनाची अभ्यासपूर्ण मांडणी या मालिके तून क रण्यात येईल.
– अजय भाळवणकर, बिजनेस हेड, सोनी मराठी