यंदाच्या ऑस्करमध्येही भारतीय चित्रपट नसले तरी भारतीय निर्माती गुनित मोंगा हिनं आपली मोहोर उमटवली आहे. गुनित मोंगा यांच्या ‘पिरियड. एंड ऑफ सेंटेंस’ ला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्टचा ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे. ही नक्कीच भारतीयांसाठी आनंदाची बाब आहे.

त्यामुळे भारतीय सेलिब्रिटींनी गुनित मोंगा यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ट्विटरवर गुनित यांच्यावर शुभेच्छांचा, कौतुकाचा वर्षाव होत आहे. हे यश समस्त महिलांचे आहे असं मानणाऱ्या गुनितचं बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांनी कौतुक केलं आहे. प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार, परेश रावल, विकी कौशल यांनी गुनित यांना यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

दिल्लीलगतच्या हापूर गावातील एका महिलेची कहाणी या चित्रपटात आहे. हा माहितीपट दिल्लीतील हपूर गावावर आधारित आहे. या गावामध्ये देखील मासिकपाळीबद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. मासिकपाळीच्या दरम्यान घ्यायच्या काळजीबद्दल अनेक महिला अनभिज्ञ आहेत त्यामुळे या महिलांना आरोग्याच्या अनेक तक्रारींना समोर जावं लागतं. या गावात सॅनिटरी पॅड्स बनवणारं मशिन बसवलं जातं. पैसे जमा करून हे मशिन्स बसवलं जातं त्यानंतर महिला पॅड्स तयार करायला शिकतात, आरोग्याविषयी जागृती निर्माण होते साधरण अशा स्वरुपाचा प्रवास या माहितीपटात आहे.

Story img Loader