‘डू द रेक्स’ मोहिम राबवित असलेल्या एका निरोध कंपनीच्या बोल्ड जाहिरातीत अभिनेता रणवीर सिंगने काम केल्यापासून तरुणांमध्ये तो एक ‘सेक्स आयकॉन’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. ‘सेक्स’ ही नैसर्गिक गोष्ट असून, आता या विषयाला शयनगृहाच्या बाहेर आणण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन त्याने केले. या विषयी बोलताना तो म्हणाला, शृंगार ही अतिशय सुंदर अशी नैसर्गिक गोष्ट आहे. प्रत्येकजण याचा अनुभव घेतो आणि यात वाईट असे काहीच नसुन, शृंगाराविषयी दडपण बाळगण्याचे काहीच कारण नाही. भारतीय लोकांमधील याविषयीचा कोंडलेपणा दूर करण्यासाठी तरुणांना मोकळेपणाने या विषयावर मतप्रदर्शन अथवा चर्चा करता यावी, यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे अत्यंत महत्वाचे आहे. ‘सेक्स’सारखा अत्यंत महत्वाचा विषय दुर्लक्षित राहिल्याने तरुणांमध्ये याबाबतच्या समस्या उदभवत असल्याचे रणवीरचे मानणे आहे. तो म्हणाला, आपला जन्म ज्यामुळे झाला, त्याविषयी बोलण्यास आपल्याला लाज वाटते हे मुर्खपणाचे आहे. भारतीयांची ‘सेक्स’बाबतची मानसिकता बदलण्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. भारतात याविषयाला तुच्छ मानले जाते. अनेकवेळा लोक याविषयीचे विनोद करताना दिसतात, परंतु याविषयी खुलेपणाने बोलायची वेळ येताच ते टाळाटाळ करतात. हा पाखंडीपणा देशात सर्वदूर पसरला आहे. समाजातील मोठ्या वर्गासाठी आजही ही गोष्ट निषिद्ध आहे. ‘एमटीव्ही’ आणि ‘ड्युरेक्स’ कंडोमच्या संयुक्त विद्यमाने निर्माण करण्यात आलेल्या ‘ड्युरेक्स एमटिव्ही रेक्स टॉक’ नावाच्या शोद्वारे तरुणांमध्ये ‘सेक्स’बाबत जागृती निर्माण करणासाठी रणवीर सिंग या शोमध्ये सहभागी झाला होता, ज्याचे सोमवारी ‘जागतिक एडस् दिना’च्या दिवशी प्रसारण करण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा