अभिनेता-निर्माता फरहान अख्तरने नुकतेच शादी के साइड इफेक्टस या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले. मात्र, चित्रपटातील दोन गाण्यांचे चित्रीकरण करणे बाकी असून ते ऑगस्ट महिन्यात करण्यात येईल, असे फरहानने भाग मिल्खा भाग चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळी सांगितले. चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत असून प्रितीश नांदीने याचे दिग्दर्शन केले आहे. फरहान म्हणाला की, सर्व शूटींग पूर्ण झाल्यावर मी पटकथा लिहिण्यास सुरुवात करणार आहे. मी एकाच वेळी अनेक कामे करणार असून पटकथा लिखाण, वाचन आणि इतर पटकथा ऐकणार आहे.
१२ जूलैला फरहानचा भाग मिल्खा भाग चिरत्रपट दाखल होणार आहे.

Story img Loader