गायनाच्या आणि नृत्याच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर प्रसिद्ध गायक शान आता अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करतोय. ‘बलविंदर सिंग फेमस हो गया’ या हिंदी चित्रपटातून शान आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात करतोय.
सुनील अग्निहोत्री आणि मिका सिंग हे दोघेही या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, त्याचे चित्रीकरण सुरू आहे. शान याच चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये सध्या व्यस्त आहे.
चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदित झालोय. ‘बलविंदर सिंग फेमस हो गया’ हा विनोदी चित्रपट आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटात काम करण्याची माझी इच्छा होती. ती या चित्रपटामुळे पूर्ण होतेय, अशी भावना शानने त्याच्या नव्या क्षेत्रातील पदार्पणाबद्दल व्यक्त केली.
कलर्स वाहिनीवर सुरू असलेल्या ‘झलक दिखला जा’च्या सहाव्या पर्वात शान स्पर्धक म्हणून सहभागी झालाय. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये त्याच्या परफॉर्मन्समुळे तो अंतिम फेरीसाठीचा तुल्यबळ स्पर्धक समजला जातो.

Story img Loader