एकेकाळी ‘वॉटर’ या दीपा मेहताच्या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी केशवपनाचा धाडसी निर्णय घेऊन डोक्यावरील केस काढणारी बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी पुन्हा एकदा केस छोटे करण्याच्या मनःस्थितीत असल्याचे दिसते. यासाठी तिने टि्वटरवरील तिच्या चाहत्यांचा सल्लादेखील मागविला आहे. मी पुन्हा एकदा छोटे केस करू का, असा प्रश्नच या ६४ वर्षीय अभिनेत्रीने चाहत्यांना टि्वटरच्या माध्यमातून विचारला आहे. तिला कुठली हेअरस्टाईल सुट करेल, याचा निर्णय चाहत्यांना घेता यावा, यासाठी तिने स्वत:चे छोट्या केशरचनेतील छायाचित्रही टि्वटरवर पोस्ट केले आहे. शबाना केस छोटे करणार का, हे पाहणे तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरेल.

Story img Loader