बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी आणि त्यांचे पती प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी ‘इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी वीक’मध्ये पहिल्यांदाच एकमेकांसोबत रॅम्प वॉक केले. ‘गोलेचा ज्वेलर्स’साठी शबाना आणि जावेद अख्तर यांनी रॅम्प वॉक करण्यास सुरूवात करताच टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले. लाल आणि काळ्या रंगाच्या पोषाखावर हिरव्या पाचूचा हार घातलेल्या शबाना अतिशय सुंदर दिसत होत्या. जावेद अख्तर यांनी काळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती, ज्यावर गडद लाल पाचू आणि मोत्यांनी सजलेले पदक लावलेले होते.

‘उमराव जान’, ‘लक बाय चान्स’ आणि ‘द्रोणा’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांसाठीचे दागिने आणि ‘मिस इंडिया युनिव्हर्सचा’ मुकुट तयार करणा-या ‘गोलेचा ज्वेलर्स’ने ‘रॉयल ब्राइड्स’ या शीर्षकाद्वारे आपले शानदार दागिने सादर केले.

 

Story img Loader