बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना सर्वसामान्यांप्रमाणे एखाद्या घटनेचा सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वी एका मराठी कलाकाराची पर्स चोरीला गेली होती. त्यानंतर आता बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी त्यांची २१ वर्षीय भाची मेघनासोबत घडलेल्या एका भयानक घटनेचा खुलासा केला आहे. त्यासोबतच त्यांनी मेघनासोबत एका ओला कॅब ड्रायव्हरने केलेल्या घटनेची माहिती दिली आहे.

शबाना आझमी यांची भाची मेघना यांनी फेसबुक पोस्ट लिहित या भयानक घटनेबद्दल सांगितले आहे. त्यात तिने काही दिवसांपूर्वी मध्यरात्री एका कॅब ड्रायव्हरने केलेल्या घटनेबद्दल सांगितले आहे. मेघनाने पोस्ट लिहित म्हटले की, “मी लोअर परळ ते अंधेरी पश्चिम अशी ओला कॅब बूक केली होती. त्या कॅब ड्रायव्हरने माझी राइड स्वीकारली आणि तो मला घ्यायला आला. यानंतर काही मिनिटांनी त्याला असे वाटले की त्या रस्त्याला फार ट्राफिक आहे. त्याला घरी यायला उशीर होईल, म्हणून त्याने मला दादरच्या ब्रीजवर सोडले.”

When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
PM Narendra Modi on Godhra Train Burning
“मी जबाबदारी घेतो, हवं तर लिहून देतो, पण…”, पंतप्रधान मोदींचं गोध्रा जळीतकांडावर भाष्य
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”

“मध्यरात्रीची वेळ असल्याने दुसरी टॅक्सी शोधणे फार कठीण होते. त्यानंतर मी तिथून चालत दादर मार्केटपर्यंत पोहोचले. त्यानंतर मला माझ्या घरी पोहोचण्यासाठी तब्बल २ तास लागले. घडलेली ही घटना मला अजिबात मान्य नाही ओला.”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. तिच्या या पोस्टनंतर शबाना आझमी यांनी ट्विटरवर तिच्या पोस्टची लिंक शेअर केली आहे. त्यासोबतच त्या म्हणाल्या, “माझ्या २१ वर्षीय भाचीला ओला कॅबचा खूप भयानक अनुभव आला आहे. हे अजिबात मान्य करण्यासारखे नाही.”

“निर्माता म्हणून माझ्या प्रत्येक चित्रपटात चुका पण…”, करण जौहरने दिली कबुली

शबाना आझमी या फराज आरिफ अन्सारीच्या यांच्या शीर कुर्मा चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता ती करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शबानासोबत रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र आणि जया बच्चन हे देखील दिसणार आहेत.

Story img Loader