ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी करिना कपूरच्या ‘फेव्हिकॉल से’ या गाण्यावर तोफ डागली आहे. ‘वुमन ऑफ वर्थ’ अभियानच्या लाँन्चवेळी त्यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केले तेव्हा त्या बोलत होत्या.
शबाना म्हणाल्या की, आयटम साँगला माझा नेहमीच विरोध आहे. जर एखादी टॉपची अभिनेत्री म्हणते, ‘मैं तंदूरी मुर्गी हूं यार, गटका ले सय्या अल्कोहॉल से’ तर तो हसण्याचा मुद्दा नाही. ही एक गंभीर गोष्ट आहे. गाणे लिहिणारा एक जण असतो. ते बनवणारे काही जण असतात पण पाहाणारे करोडो लोक असतात. अगदी सहा वर्षाची मुलेही या गाण्यावर नाचताना, गाताना तुम्ही पाहतो. अशावेळी तुमची काही जबाबदारी नाही का? ही गमतीची गोष्ट नाही,” या शब्दांत शबाना यांनी यावेळी सुनावले.
शबाना आझमी यांनी यापूर्वीही आपली मते परखडपणे मांडली आहेत. पण त्यांनी उघडपणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन त्याच्यावर टीका करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Story img Loader