बॉलीवूडमधील हल्लीची गाणी किंवा आयटम साँग व त्यातील शब्द यांचा एकमेकांशी काही संबंध असतोच असे नाही. केवळ ‘प्रदर्शन’ इतकाच त्या गाण्यांचा उद्देश असतो. अशाच एका गाण्यावरून ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी भडकल्या आहेत. अभिनेत्री करिना कपूरच्या ‘फेव्हिकॉल’से या गाण्यावर त्यांनी तोफ डागली आहे.  ‘दबंग-२’ या चित्रपटातील करिना कपूरच्या ‘फेव्हिकॉल से’ या गाण्यावर शबाना आझमी यांनी आक्षेप घेतला आहे. जागतिक  ‘वूमन ऑफ वर्थ’ या उपक्रमाच्या निमित्ताने त्यांनी ‘आयटम साँग’ आपण नेहमीच विरोध केला असल्याचे सांगितले. जर एखादी अभिनेत्री ‘मै तंदुरी मुर्गी हू यार’ ‘गटका ले सय्या अल्कोहोल से’ असे काही म्हणत असेल तर ती गंभीर बाब आहे.  गाणे लिहिणारा एक जण असला ते तयार करणारे काही जण असले तरी ते गाणे पाहणारे हजारो, लाखो असतात. ज्यांना काहीही समजत नाही, अशी लहान मुलेही या अशा गाण्यांवर नाचतात, ती गाणी म्हणतात. हे थांबविण्याची जबाबदारी आपली सगळ्यांचीच आहे, असेही शबाना आझमी यांनी सुनावले.

Story img Loader