राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री शबाना आझमी यांना बुधवारी व्हॅंकुवर येथील सिमॉन फ्रासेर विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे. शबाना आझमी यांना मिळणारी ही चौथी डॉक्टरेट पदवी आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख चेहरा असलेल्या ६२ वर्षीय शबाना आझमी यांना या आधी २००३ मध्ये जाडवपूर विद्यापीठाची, २००७ मध्ये मेट्रोपॉलिटन विद्यापीठाची आणि २००८ मध्ये जामिया मिलिया विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. शबाना आझमी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मी अमेरिकेला जात आहे. १२ जूनला सिमॉन फ्रासेर विद्यापीठातर्फे मला डॉक्टरेट मिळणार आहे. आपल्या पतीसोबत अमेरिकेला गेलेल्या शबाना ड्युरी लेन थिएटरमध्ये ‘भारतीय सिनेमाची १०० वर्षे’ या विषयावर भाषण करणार आहेत.

Story img Loader