अभिनेत्री शबाना आझमी पाचव्यांदा डॉक्टरेटची पदवी स्वीकारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जागतिक मनोरंजनसृष्टीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल टेरी(TERI) विद्यापीठातर्फे शबाना आझमी यांना डॉक्टरेट देण्यात येणार आहे. ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करताना शबाना आझमी यांनी टेरी विद्यापीठाकडून ५ फेब्रुवारी रोजी मिळणार असलेल्या डॉक्टरेटबद्दल आपण आभारी आणि मनापासून ऋणी असल्याचे सांगितले. तसेच आपल्याला पाचव्यांदा डॉक्टरेट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यापूर्वी त्यांना जादवपूर विद्यापीठ, लीडस मेट्रोपोलिटिअन विद्यापीठ, जामीया मिलिया विद्यापीठ आणि सायमन फ्रेझर विद्यापीठाकडून डॉक्टरेटची पदवी मिळाली होती. आतापर्यंत १००हून अधिक व्यवसायिक तसेच समांतर दर्जाच्या हिंदी चित्रपटांमध्ये शबाना आझमी यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांना पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

Story img Loader