बॉ़लीवूडमध्ये जूही चावला आणि शाहरुख खान यांची मैत्री नावाजली जाते. दोघही खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. मात्र, आता या मैत्रीत थोडासा दुरावा आला आहे, असे जूही चावलाला वाटते.
जूही म्हणाली की, कोणाचीच मैत्री पूर्वावत राहत नाही. आम्ही फार व्यस्त लोक आहोत. त्यातून, शाहरुख तर इतर व्यक्तिंपेक्षा जास्त व्यस्त असतो. त्यामुळेच आमच्या दोघांकडे मैत्रीसाठी वेळच कुठे आहे? पण, आम्ही मित्र-मैत्रिण आहोत याबाबत कोणतीच शंका बाळगू नये. केवळ शाहरुखचं नाही तर चित्रपटसृष्टीतील कोणाशीच मला व्यवस्थित भेट घेता येत नाही. आम्ही सगळेच आमच्या कामात धावपळ करत असतो.
जूही-शाहरुखची जोडी चित्रपटसृष्टीतील एक हीट जोडी राहिली आहे. या दोघांनी राजू बन गया जेन्टलमॅन, डर, डुप्लीकेट, यस बॉस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. शाहरुखसोबत पुन्हा एकदा काम करण्याची तयारी तिने यावेळी दर्शविली. पण, कसे, कुठे, केव्हा…. ह्या गोष्टी शाहरुखलाच विचारल तर बरं होईल, असे जूही म्हणाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा