९०च्या दशकातील ‘करण अर्जुन’ हा चित्रपट एक आयकॉनिक चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल, सलमान खान आणि ममता कुलकर्णी हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील शाहरुख आणि काजोलची जोडी हिट ठरली होती. एका जुन्या मुलाखतीमध्ये या चित्रपटातील गाणे ‘जाती हूं जल्दी है क्या’ विषयी करण जोहर आणि शाहरुखने सांगितले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करण जोहरने एका मुलाखतीमध्ये ‘करण अर्जुन’ या चित्रपटातील एक सीन विषयी सांगितले होते. करण म्हणाला, ‘चिन्नी प्रकाश आणि रेखा प्रकाश हे काजोलला अॅक्रोबेटिक आणि सेमी व्हल्गर मूव्हमेंट शिकवत होते. दरम्यान शाहरुखने मजेशीर अंदाजात म्हटले की काजोल डान्ससाठी तयार आहे.’ त्यानंतर करण पुढे म्हणाला की, ‘ते ऐकून काजोलला प्रचंड राग आला होता. ती रागात जाऊन बसली आणि पुस्तक वाचत होती.’

काजोलच्या डान्सविषयी बोलताना शाहरुख म्हणाला, ‘गवताजवळ गाण्याचे चित्रीकरण सुरु होते. काजोलला चेहऱ्यावर थोडे विचित्र हावभाव दाखवायचे होते. तिच्यासाठी ते फार कठीण होते. मला नाही माहिती का, पण हे सोपे होते. हे मजेशीर होते कारण काजोल सतत म्हणत होती की तिला हे जमत नाहीये. मी मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. पण हे खूप विचित्र होते.’

त्यानंतर ‘दिलवाले’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी शाहरुख आणि काजोलने करण अर्जुन चित्रपटातील गाण्यावर वक्तव्य केले होते. तेव्हा काजोल म्हणाली, ‘आम्ही यापूर्वी असे गाणे कधी केले नव्हते. आम्ही एका वेगळ्या परिस्थितीमध्ये होतो. आम्ही चित्रीकरण झाल्यावर किती हासत होते याचा विचारही तुम्ही करु शकत नाही.’