अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या प्रेमीयुगुलाने नव्या वर्षाचे स्वागत ऑस्ट्रेलियात केले. ‘पीके’च्या यशाने सध्या आनंदात असलेली अनुष्का प्रियकर विराट कोहलीसाठी ऑस्ट्रेलियाला पोहलचली आहे. हे दोघेही त्यांच्या मित्रासोबत ऑस्ट्रेलियात फिरताना दिसले.
गेले काही महिने विराट आणि अनुष्का हे एकत्र फिरत आहेत. त्यांच्याबाबत अनेक प्रश्न केले जात असताना विराटने क्रिकेट सामन्यात शतक झळकावल्यानंतर अनुष्काकडे पाहत हवेत चुंबन दिले. त्यानंतर या दोघांच्या प्रेमसंबंधावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Story img Loader