Shahrukh Khan at Nayanthara Vignesh Shivan Marriage : दक्षिणेतील पॉवर कपल नयनतारा (Nayanthara) आणि विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) यांच्या लग्नाच्या विधी सुरू झाले आहेत. नयनतारा आणि विघ्नेश आज म्हणजेच ९ जून रोजी महाबलीपुरम येथील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. या लग्नात सहभागी होण्यासाठी अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) महाबलीपुरमला पोहोचला आहे. तीन दिवसांपूर्वी शाहरुख खानला करोनाची लागन झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासगळ्यात शाहरुख कोविडमधून बरा झाला असून त्याने लग्नाच्या ठिकाणी स्टाईलने प्रवेश करून नयनतारा-विघ्नेशच्या लग्नाला थक्क केले.

आणखी वाचा : Mahima Chaudhry Breast Cancer : महिमा चौधरीला स्तनाचा कर्करोग, अनुपम खेर यांनी शेअर केला केमोथेरपीनंतरचा व्हिडीओ

नयनतारा आणि विघ्नेश शिवनच्या लग्नाच्या ठिकाणावरून शाहरुखचे काही फोटो त्याची मॅनेजर पूजाने शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अॅटलीच्या ‘जवान’मध्ये शाहरुख नयनतारासोबत दिसणार आहे. चित्रपटातील शाहरुखचा फर्स्ट लूक नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला आहे. शाहरुखला या स्टाईलमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. शाहरुखला ३ दिवसांपूर्वी करोना झाला होता आणि आता तो ठीक असल्याचे पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

आणखी वाचा : लग्नानंतर ‘या’ आलिशान घरात राहते अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर

आणखी वाचा : Kon Honar Crorepati 6 : “मी मराठीतून प्रश्न विचारणार”, हे ऐकताच काजोलन केले असे काही

आणखी वाचा : विचित्र कपड्यांवरून ट्रोल होणाऱ्या उर्फी जावेदची एकूण संपत्ती आणि कमाई ऐकलीत का?

शाहरुख अलीकडेच करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाला होता. याच पार्टीत चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पार्टीतच शाहरुख आणि कतरिनाला करोनाची लागन झाली होती. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांच्या लग्नात शाहरुख व्यतिरिक्त बॉलिवूड फिल्ममेकर बोनी कपूर, रजनीकांत आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Story img Loader