बॉलीवूड बादशाह शाहरुख खानने सलमान आणि अमिताभ बच्चन यांना मागे टाकले आहे. बॉलीवूडमधील आकर्षक व्यक्तिमत्वाच्या यादीत शाहरुखने अव्वल स्थान पटकाविले आहे.
ट्रस्ट रिसर्च अडव्हायसरी यांनी केलेल्या १६-शहर सर्वेक्षणानुसार शाहरुख भारतातील सर्वाधिक आकर्षक व्यक्तिमत्व असलेला सेलिब्रिटी ठरला आहे. चित्रपट, क्रिडा, समाजिक-आध्यात्मिक, व्यवसाय आणि गायन या क्षेत्रांतील २५ व्यक्तिंचा समावेश आकर्षक व्यक्तिमत्वाच्या यादीत करण्यता आला आहे. या सर्वेक्षणानुसार, शाहरुखनंतर अमिताभ बच्चन, क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी आणि चौथ्या स्थानी आमिरचा नंबर लागला आहे. त्यानंतर, मिथुन चक्रवर्ती, कतरिना कैफ, सलमान खान, सचिन तेंडुलकर आणि इतरांची नावे आहेत.

Story img Loader