बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने अगदी शेवटच्या क्षणी अभिनेता अजय देवगणसोबत चित्रीकरण करण्यास नकार दिला आहे. अजय आणि शाहरुख एका जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत. पण शाहरुखने ऐनवेळी चित्रीकरणास नकार दिला.
ईटाइम्सला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख आणि अजय एका जाहिरातीसाठी एकत्र काम करणार होते. शाहरुख सेटवर येण्यापूर्वी तयारी करण्यात आली होती. सर्वजण शाहरुखची सेटवर वाट पाहात होते. पण शाहरुखने शेवटच्या क्षणी चित्रीकरणास नकार दिला.
‘शाहरुख सेटवर येणार म्हणून जवळपास २५ बाउंसर तयार ठेवण्यात आले होते. तसेच त्याच्यासाठी एक व्हॅनिटी देखील तयार ठेवली होती. सेटवर सर्वजण शाहरुखची वाट पाहात होते. पण शाहरुखने ऐनवेळी शूटला येण्यास नकास नकार दिला. शाहरुख अजय देवगणसोबत हे शूट करणार होता. सध्या शाहरुखचे कुटुंबीय कठीण काळातून जात आहे. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. अजय सेटवर लवकर पोहोचला होता. त्याने त्याचे चित्रीकरण पूर्ण केले आहे’ अशी माहिती सूत्रांनी ईटाइम्सला दिली आहे.