आपल्या आगामी चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटाच्या संगिताचे अनावरण करण्यासाठी आलेल्या शाहरूख खानने सरोगसीद्वारे जन्मलेला तिसरा मुलगा ही  वैयक्तिक बाब असल्याचे सांगितले. तो  म्हणाला, माझ्यासाठी हा क्षण आनंद आणि उदासीनता अशा संमिश्र भावनांनी भरलेला आहे. महानगरपालिकेच्या संबधित अधिका-यांनी माझ्या मुलाच्या जन्माची योग्य ती शहानिशा करण्याचे काम सुरू ठेवावे.
याआधी महापालिकेच्या अधिका-यांनी शाहरूख आणि गौरी खानच्या सरोगेट मदरद्वारे जन्मलेल्या तिस-या मुलाच्या जन्माच्या वृत्ताचे समर्थन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाचा जन्म २७ मे रोजी मसरानी रुग्णालयात झाला. शाहरूख आणि गौरीला याआधी आर्यन आणि सुहाना नावाची दोन मुले आहेत. या मुला विषयीच्या प्रश्नांना उत्तर देताना शाहरूख म्हणाला, आपण यावर नंतर बोलू. तिस-यांदा वडील झाल्यावर कसे वाटते, एका पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना शाहरूख म्हणाला, तुझ्या हेल्थ रिपोर्टरला विचार…

Story img Loader