बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या कुटुंबाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरु आहे. शनिवारी २ ऑक्टोबरला रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापेमारी करत बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतलं. रविवारी आर्यनला अटक करण्यात आली. त्यानंतर आर्यनसह इतर सात जणांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या संपूर्ण प्रकरणानंतर खान कुटुंबाची बी-टाऊनमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला पाठिंबा देत आहेत. नुकतंच या संपूर्ण प्रकरणावर शाहरुखसोबत काम केलेल्या एका सहकलाकाराने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “आता देवच त्यांच्यावर बहिष्कार टाकत आहे,” असे सांगत अभिनेता पुनीत वशिष्ठने शाहरुखवर निशाणा साधला.

अभिनेता पुनीत वशिष्ठ मंगळवारी अंमली पदार्थविरोधी पथकाच्या मुंबई ऑफिसबाहेर काही कामानिमित्त गेला होता. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्याला आर्यन खानच्या अटकेबद्दल काही प्रश्न विचारले. त्यावेळी पुनीतने फार रागारागात संतापत त्याला प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी पुनीत म्हणाला, “मी या सर्व प्रकरणात सहभागी नाही. गेल्या २७ वर्षापूर्वी सिनेसृष्टीतील खानांनी माझ्यावर बहिष्कार टाकला आणि आता देव त्यांच्यावर बहिष्कार टाकत आहे.”

बॉम्बे टाईम्सने त्यांच्या इन्स्टाग्रामवर याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत पुनित प्रचंड रागात असल्याचे दिसत आहे. “मी ‘जोश’, ‘क्या कहना’ यासारख्या सर्व चित्रपटात काम केलंय. पण मी या सर्व गोष्टीत कधीही सहभागी झालो नाही. त्यामुळे खान-पान यांनी २७ वर्षे मला सिनेसृष्टीतून बहिष्कृत केले. आता मात्र देव त्यांच्यावर बहिष्कार टाकत आहे.” असे पुनीत म्हणाला.

यापूर्वीही पुनीत वशिष्ठने शाहरुख खानवर अनेकदा निशाणा साधला आहे. पुनीत वशिष्ठने जुलै २०२१ मध्ये शाहरुख खानला अपात्र ठरवले होते. पुनीत वशिष्ठने शाहरुख खान, सलमान खान यांची तुलना विद्युत जामवालशी केली होती. विद्युत जामवालसमोर ‘सलमान खान, शाहरुख खान, रणवीर सिंह … काय आहेत’ असे पुनीतने म्हटले.

Story img Loader