अभिनेता शाहरूख खानच्या विरोधात बडोदा रेल्वे स्टेशनवर ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूसंबंधी खटला दाखल होऊ शकतो. पोलीस उपाध्यक्ष (पश्चिम रेल्वे) तरूण बरोत न्यायालयात अहवाल सादर करताना म्हणाले की, ‘२३ जानेवारी रोजी झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी शाहरूख खान आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेडवर आईपीसी कलम 304 ए 2 (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि रेल्वे अॅक्टअंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो.’ पोलिसांनी १७ एप्रिल रोजी संपूर्ण घटनेचा अहवाल सुपूर्द केला होता. या अहवालात शाहरूखमुळे रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि शाहरूखच्या टीमने सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा उल्लेख आहे. इतकंच नाही तर शाहरूखने आपला टी-शर्ट आणि चेंडू फलाटावर उभ्या असलेल्या लोकांच्या दिशेने भिरकावल्याचंही अहवालात म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा