बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान यांची लेक सुहाना खान नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. सुहाना खान ही सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच सुहाना खानने तिचा नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
सुहाना खानने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात तिचा चमकदार चेहरा पाहायला मिळत आहे. यात तिने दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत तिचे डोळे बंद आहे, तर एका फोटोत तिचे डोळे उघडे दिसत आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. सुहाना खानने या फोटोंना कॅप्शन देताना ‘डू नॉट डिस्टर्ब’ म्हणजे ‘व्यत्यय आणू नका’, असे म्हटले आहे.
सुहानाने तब्बल महिनाभराने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टला अनेकजण लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हार्ट इमोजी शेअर करत त्यावर कमेंट केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सुहाना खानने न्यूयॉर्क सोडत असल्याची घोषणा केली होती. सुहाना न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेत होती. मात्र सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने न्यूयॉर्क सोडत असल्याचे म्हटले आहे. सुहानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर न्यूयॉर्कमधील एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर ‘काळजी करु नका. जरी तुम्ही न्यूयॉर्क सोडून जात असला तरी तुम्ही कायम न्यूयॉर्कचे नागरिक राहाल’ असे लिहिण्यात आले आहे. हा फोटो शेअर करत तिने एक इमोजी वापरला होता. त्यानंतर सोशल मीडियावर सुहानाच्या पोस्टची चर्चा रंगली होती.
वाढदिवसानिमित्त सलमान खानवर शुभेच्छांचा वर्षाव, कतरिना कैफची ‘खास’ पोस्ट चर्चेत
एकीकडे सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यासाठी ती न्यूयॉर्क सोडून भारतात परत आली असल्याचे म्हटले जात आहे. सुहाना झोया अख्तरच्या ‘अर्चिस’ या सीरिजमधून पदार्पण करणार आहे. सुहाना सोबत खुशी कपूर, अगस्त नंदा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.