बॉलीवूड बादशाह शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण चेन्नई एक्स्प्रेसच्या यशानंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. हे दोघेही फराह खानच्या ‘हॅप्पी न्यू इयर’मध्ये दिसणार असून दोघांनी त्याच्या चित्रिकरणास सुरुवात केली आहे. अभिषेक बच्चन, सोनू सूद आणि बूमन इराणी याआधीच दुबईला पोहचले असून त्यांनी १ सप्टेंबरपासून चित्रिकरणास सुरुवात केली. मात्र, मागून गेलेले शाहरुख आणि दीपिका आता सहकलाकारांसोबत कामाला लागले आहेत.
यापूर्वी, शाहरुखच्या हातावरील शस्त्रक्रियेमुळे चित्रपटाचे चित्रिकरण पुढे ढकलण्यात आले होते. तसेच, दीपिकादेखील तिच्या कुटुंबियांसमवेत युरोपमध्ये सुट्टी घालविण्यासाठी गेली होती.
दुबईला जाण्यासाठी सज्ज असल्ेल्या शाहरुखचे विमानतळावरील छायाचित्र

Story img Loader