बॉलीवूड बादशाहा शाहरुख खानला वाहतूकीमध्ये अडकल्यावर एकाएकी रेल्वेची आठवण झाली. आता तुम्ही म्हणाल शाहरुखला का होईल रेल्वेची आठवण? आणि झालीचं तरी थोडी तो रेल्वेने प्रवास करणार आहे. ते ही बरोबर आहे. तो काही रेल्वेने प्रवास करणार नाही. तर झाले असे की, डबस्मॅशच्या वाढत्या क्रेझची भूरळ शाहरुख खानलाही पडली आहे. त्यामुळे वाहतूकीत अडकलेल्या शाहरुखला आपल्या ‘चल छय्या छय्या’ या गाण्याची आठवण झाली आणि त्याने लगेचचं त्याचं डबस्मॅश केलं.
शाहरुखचा १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल से’ या चित्रपटाला नुकतीच १७ वर्ष पूर्ण झाली. त्यामुळेच ‘दिल से’ या चित्रपटातील ‘चल छय्या छय्या’ या लोकप्रिय गाण्याची आठवण करत त्यावर आधारीत शाहरुखने डब्समॅश बनवले आहे. ट्रॅफीकमध्ये अडकलो आहे, माझी रेल्वे येथे असती तर… अशा प्रकारचे ट्वीट करत शाहरुखने आपल्या दिल से या चित्रपटाली ‘चल छय्या छय्या’ या गाण्याचा डब्समॅश व्हिडिओही प्रदर्शित केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा