शाहरुख-काजोलच्या आगामी ‘दिलवाले’ चित्रपटातील गेरुआ हे गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले. डोळ्यांना सुखावणारे हे गाणे चित्रीत करताना शाहरुख-काजोलला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. नयनरम्य अशा आइसलँडच्या थंडगार वातावरणात चित्रीकरण करणे हे ‘दिलवाले’च्या टीमसाठी मोठे आव्हान होते.
‘गेरूआ’ गाण्याचे चित्रीकरण कसे झाले याची मेकिंग तयार करण्यात आली आहे. रोहित शेट्टी आता गाड्यांनंतर दुप्पट्टे उडवणार आहे अशा विनोदाने शाहरुख-काजोल या मेकिंगची सुरुवात करतात. यात काजोलने शाहरुखला पडताना कसे वाचवले, गाण्यात दिसत असलेल्या मोडक्या विमानामागचे रहस्यही त्यांनी उलगडले. पुन्हा गाण्यात दिसत असलेले इंद्रधनुष्य हे खरे असल्याचेही त्यांनी सांगितले. एका वेळी तीन इंद्रधनुष्य मी अजूनपर्यंत कधीचं पाहिली नव्हती. खूप सुंदर दृश्य होते ते .. असे शाहरुख म्हणाला. विशेष म्हणजे गाण्यातील काही दृश्य चित्रीत करण्यासाठी ड्रोनचाही वापर कण्यात आलायं. तर जाणून घेऊया कसे झाले ‘गेरुआ’ गाण्याचे मेकिंग.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा