‘कोलकता नाईट रायडर्स’ संघातील ब्रॅड हॉग आणि जोहान बोथासारख्या वयानी मोठ्या असलेल्या खेळाडूंना खेळताना पाहून आपल्याला अधिक तरुण झाल्यासारखे वाटते, अशी भावना ‘कोलकता नाईट रायडर्स’ संघाचा सहमालक आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने व्यक्त केली. “केकेआर मी तुमच्यावर प्रेम करतो. आपण एका शानदार संघाचा हिस्सा आहोत… हॉग आणि बोथासारख्या खेळाडूंना पाहून मी स्व:तला अधिक तरूण समजायला लागलो आहे”, असे टि्वट शाहरुखने पोस्ट केले आहे. ईडन गार्डन मैदानावर झालेल्या ‘आयपीएल’ सामन्यानंतर शाहरुखने आपला हा आनंद व्यक्त केला. या सामन्यात त्याच्या संघाने ‘सनरायजर्स हैदराबाद’चा ३५ धावांनी पराभव केला.

Story img Loader