मी हिंदी चित्रपटसृष्टीचा भाग नसतानाही, चित्रपटसृष्टी नेहमीच माझ्याशी उदार राहिल्याने ही माझी ‘सरोगेट फॅमिली’ असल्याचे शाहरुख खान म्हणतो. येथे येण्यासाठी मला धडपड करावी लागली नसल्याने याबाबत बोलण्यासारखे माझ्याकडे काही नाही. संपूर्ण चित्रपटसृष्टीने मला स्वीकारल्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. चित्रपटसृष्टी मला ‘सरोगेट फॅमिली’सारखी आहे, असे शाहरुख खान ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपट संगीताच्या अनावरणावेळी म्हणाला.
शाहरुख त्याच्या खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतून उभारत असून या कार्यक्रमात तो दीपिका पादुकोणसोबत चित्रपटातील गाण्यावर थिरकला. यावेळी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी, निकीतिन धीर, संगीतकार शेखर रावजियानी, गायक नीती मोहन, निर्माता रॉनी स्क्रुवाला हे देखील उपस्थित होते. या प्रसंगी शेखर म्हणाला, ‘चित्रपटाचे संगीत सुमधुर आहे. एसपी बालसुब्रमण्यम यांचा मी फार मोठा चाहता असून ६७ वर्षीय सुब्रमण्यम यांचा आवाज २० वर्षाच्या मुलासारखा आहे.’ बालसुब्रमण्यम यांनी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हे शीर्षकगीत अनोख्या पद्धतीने गायले आहे.

Story img Loader