शाहरुखचे माध्यमांशी मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. तो आर्यन आणि सुहाना यांनाही माध्यमांपासून लांब ठेवत नाही. ईदच्या दिवशी त्याने संपूर्ण कुटुंबासह मन्नत या बंगल्यावर माध्यमांशी आणि चाहत्यांशी संवाद साधला होता. मात्र, बॉलीवूड बादशाह त्याचे तिसरे अपत्य अब्राम याच्याबाबत जरा जास्तच सतर्कपणे वागत आहे.
शाहरुख खान त्याच्या कुटुंबासमवेत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी परदेशात गेला होता. तेथून भारतात परतल्यावर माध्यमांच्या गर्दीने त्याला घेरले. या गर्दीमागचे कारण होते ते ‘छोटा खान’ म्हणजेच त्याचा मुलगा ‘अब्राम खान’. माध्यमांना अब्रामची एक झलक कॅमे-यात टिपायची होती. गौरीने अब्रामला काळ्या रंगाच्या शॉलमध्ये झाकून कुशीत घेतले होते. शाहरुख गौरीला बाजूने संरक्षण देते होता. जेणेकरून अब्राम माध्यमांच्या नजरेतून दूर राहायला हवा. त्याच्या सुरक्षेसाठी फक्त शाहरुखच नाही तर मोठा मुलगा आर्यनसुध्दा अब्रामला माध्यमांपासून वाचवून मोठ्या भावाचे कर्तव्य निभावताना दिसला. शाहरुखने आपल्या दोन्ही मुलांना कधीच माध्यमांपासून लांब ठेवले नाही. मात्र, सरोगसीद्वारे जन्माला आलेल्या अब्रामच्याबाबती तो फार दक्षतापूर्वक वागत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा