बॉलीवूड बादशाहा शाहरुख खान हा ‘फॅन’ आणि ‘हॅपी न्यू इयर’च्या चित्रकरणात व्यस्त आहे. फॅन या चित्रपटात तो एका नव्या लूकमध्ये दिसणार आहे.
जगभरात करोडो चाहते असणारा शाहरुख या चित्रपटात स्वतः चाहत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुखने ट्विट केले आहे की, मी बहुतेक भूमिका केल्या त्या स्वतः घडवलेल्या होत्या. पण, आता पहिल्यांदाच मी अशी भूमिका करत आहे ज्यांनी मला घडवल….. फॅनची (चाहता) भूमिका मी साकारणार आहे. शाहरुखच्या नव्या लूकसाठी मेकअप मास्टर गेग कॅनॉम याची निवड करण्यात आली आहे. फॅन हा कौटुंबिक चित्रपट असल्याचे शाहरुखने म्हटले आहे.

यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला ‘फॅन’ १४ ऑगस्टला जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader