आपल्या मित्रांवर भेटवस्तूंचा वर्षाव करण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान ओळखला जातो. पुन्हा एकदा याची प्रचिती आली असून, शाहरूख खानने त्याची जवळची मैत्रिण आणि दिग्दर्शक फराह खानला एक नवीकोरी मर्सिडीज गाडी भेट देऊन अनोख्या पद्धतीने तिचे आभार मानले आहेत. फराह खानच्या ‘ओम शांति ओम’ आणि ‘मै हू ना’ चित्रपटात काम केलेला शाहरूख आता ‘हॅपी न्यू इयर’ या तिच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. शाहरूख खानने याआधी ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटातील त्याचा सह-कलाकार अभिषेक बच्चनला १२.५ लाखाची एक बाईक भेट म्हणून दिली होती. या आधीसुद्धा शाहरूखने त्याची जवळची मैत्रिण प्रियांका चोप्राला एक गिटार, तर संजय दत्तला १५ लाखाची बाईक भेट म्हणून दिली होती.

Story img Loader