भारत आणि चीनच्या सीमारेषेवर पकडलेल्या तीन घुसखोरांकडून घुसखोरीचे कारण जाणण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाकडून केला जात असून, तिघेही वेगवेगळी कारणे देत आहेत. त्यांनी संगितलेल्या कारणांमध्ये बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता शाहरूख खान आणि हृतिक रोशनच्या जादूचे आकर्षण हे एक कारण असल्याचे समजते. सालामो, अब्दुल खालिक आणि आदिल थोरसोंग अशी त्यांची नावे असून, ते लडाखच्या उत्तरेला असलेल्या मार्गो चौकीवर सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात आहेत. १८ ते २३ वयोगटातील या तिघांना १२ जून रोजी सुल्तानचाकूच्याजवळ पकडण्यात आले. आपण खूप गरिबीचे जीवन जगत असून, संपत्ती मिळवण्यासाठी भारतात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिघांमध्ये एकवाक्यता नसली, तरी बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख आणि हृतिकच्या जादूने आपल्याला मंत्रमुग्ध केल्याचे तिघांचेही म्हणणे आहे. आपल्या घराकडे गरिबी झेलत असलेल्या या तिघांना भारतीय चित्रपटात दाखविण्यात येणारी भारतीय संमृद्धी पाहून येथे येण्याची इच्छा झाली असल्याचा दावा तिघांनी केला. या तिघांची वेगवेगळी चौकशी करण्यात आली. ते राहात असलेल्या शियानजांग प्रदेशातील कारगालिलिक येथे शाहरूख आणि हृतिक खूप लोकप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.
या तिघांनी आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबतची माहिती आणि भारतात प्रवेश करण्याची वेगवेगळी कारणे दिली. सुरक्षारक्षकांच्या ताब्यात असलेल्या या तिघांनी पुरविलेल्या माहितीने सुरक्षारक्षक अद्याप संतुष्ट नसून, दुभाष्याच्या मदतीने त्यांची कसून चौकशी सुरू आहे. लडाखमधील खराब हवामानामुळे रस्ते बंद झाल्याने या तिघांना आणि दुभाष्याला हवाई मार्गे चौकीवर आणण्यात आले.
हे तिघे कुठून आले, हे स्पष्ट नसले तरी प्रत्यक्ष सीमारेषेपलिकडे राहण्यासाठीचा सर्वात जवळचा भाग काराकोरम प्रदेशाच्या उत्तरेला आहे. त्यांनी राकी नाला, जीवन नाला किंवा दौलत बेग ओल्डी येथून प्रवेश केला असावा अशी संभाव्यता सुरक्षा अधिका-यांना वाटत असून, त्याविषयीची माहिती मिळविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. या तिघांजवळ भारताचा एक मोठा राजनैतिक नकाशा होता. त्याशिवाय तलवारी, चाकू, अंड्याच्या पवडरीबरोबर डब्बा बंद खाणे, ९०० युआन पेक्षा अधिक चिनी चलन आणि चिनी चामड्याचे जाकेट या तिघांकडे मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा