बॉलीवूड हिरो शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांनी अंधेरीच्या लोटस बिझनेस पार्कमध्ये शहीद झालेले अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. या इमारतीत हृतिक रोशनचे ऑफीस होते
शाहरुख आणि हृतिकने ट्विटरद्वारे इतर लोकांचे प्राण वाचवणा-या शहीद नितीन यांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केले असून त्यांना सलाम केला. तसेच ट्विटरच्या माध्यमातून इवलेकर कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन हृतिक रोशनने बॉलिवूडरांना केले आहे.


अंधेरी येथील लिंक रोडवरील लोटस बिझनेस पार्क इमारतीचे वरचे तीन मजले शुक्रवारी आगीत भस्मसात झाले. तब्बल साडेसात तास हे अग्नितांडव सुरू होते. दुर्दैवाने आग विझवायला गेलेल्या अग्निशमन दलाचे जवान नितीन इवलेकर यांचा या घटनेत मृत्यू झाला होता.

Story img Loader