बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी दरवर्षी चर्चेत असते. यावर्षीही त्यांनी पार्टी दिली. ज्यात शहरुख खान, सलमान खान, संजय दत्त. शिल्पा शेट्टी यांसारख्या प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. पण सर्वाधिक चर्चा झाली ती प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शहनाझ गिलची. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये शहनाझला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तिनं या पार्टीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होत. सध्या सोशल मीडियावर तिचा अभिनेता शाहरुख खानसोबतचा एक व्हिडीओ बराच व्हायरल होताना दिसत आहे.

शहनाझ गिल आणि शाहरुख खान यांचा एक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात शहनाझला पाहून शाहरुख आणि सलमान खान खूश दिसत आहेत. जेव्हा बाबा सिद्दीकी यांच्या पार्टीमध्ये शहनाझनं हजेरी लावली त्यावेळी तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये शाहरुख खान शहनाझशी गळाभेट घेताना दिसत आहे. तर शहनाझ सुद्धा या भेटीने आनंदी झालेली दिसत आहे.

आणखी वाचा- प्रियांका चोप्राच्या परदेशातल्या हॉटेलमध्ये कशी आहे भारतीय पदार्थांची चव? बॉलिवूड दिग्दर्शकानं सांगितलं सत्य

शहनाझ आणि शाहरुख खान यांच्या या व्हिडीओमधील हे खास बॉन्डिंग पाहून चाहत्यांनी त्यावर धम्माल कमेंट केल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर आनंद व्यक्त केला आहे. शाहरुख खान हा सिद्धार्थ शुक्लाचा आवडता अभिनेता होता. तो त्याच्यासाठी प्रेरणास्थान होता त्यामुळे चाहत्यांसाठी शहनाझ आणि शाहरुख यांची ही भेट खास आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट करताना ‘बाहशाह आणि क्वीन’ अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत.

Story img Loader