बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान आपल्या बहुचर्चित ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी जखमी झाला असून, त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूख किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुंबईतील ‘जे डब्ल्यू मॅरिएट’ हॉटेलमध्ये फराह खान दिग्दर्शित हॅपी न्यू इयर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. यादरम्यान दरवाजावर आदळल्याने त्याच्या हाताला आणि तोंडाला दुखापत झाली असल्याचे समजते. या दुखापतीमुळे शाहरुखला त्वरित नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात शाहरूख सोबत अभिनेता सोनू सूद, अभिषेक बच्चन, बोमन ईराणी आणि  अभिनेत्री दिपीका पदुकोण हे देखील असणार आहेत.

Story img Loader