बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान आपल्या बहुचर्चित ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी जखमी झाला असून, त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहरूख किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुंबईतील ‘जे डब्ल्यू मॅरिएट’ हॉटेलमध्ये फराह खान दिग्दर्शित हॅपी न्यू इयर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. यादरम्यान दरवाजावर आदळल्याने त्याच्या हाताला आणि तोंडाला दुखापत झाली असल्याचे समजते. या दुखापतीमुळे शाहरुखला त्वरित नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात शाहरूख सोबत अभिनेता सोनू सूद, अभिषेक बच्चन, बोमन ईराणी आणि अभिनेत्री दिपीका पदुकोण हे देखील असणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा