srk-450छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका फौजीद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुपरस्टार शाहरूख खानने अल्पावधीतच बॉलिवूडचा बादशहा होण्यापर्यंत मजल मारली. हिंदी चित्रपटसृष्टीत बस्तान बलविलेला शाहरूख छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपतीसारख्या विविध शोंचे सुत्रसंचालन करताना नजरेस पडत असे. गेली काही वर्षे छोट्या पडद्यापासून दूर राहिलेला बॉलिवूडचा हा बादशाह परत एकदा छोट्या पडद्यावर परतला आहे. आंतरराष्ट्रीय गेम-शो ‘हूज आस्किंग’च्या धरर्तीवर आधारीत ‘इंण्डिया पुछेगा सबसे शाना कौन’ या गेम-शोचे तो सुत्रसंचालन करणार आहे. अॅण्ड टीव्हीवर या शोचे प्रसारण होणार आहे. गेमची रूपरेशा सांगताना शाहरूख म्हणाला, मला प्रश्न-उत्तराच्या खेळाचा प्रकार आवडतो. माझ्या मुलांबरोबर आणि कुटुंबियांबरोबरदेखील मी प्रश्नोत्तराचा खेळ खेळत असतो. या गेम-शोमध्ये सर्वसामान्य माणसांनी विचारलेले प्रश्न असतील, ज्याची उत्तरेदेखील सर्वसाधारण माणूसच देईल. विजेत्याला रोख बक्षिस मिळेल. शोमध्ये उत्साही आणि आनंदी वातावरण ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर असेल. शाहरूखचा हजरजबाबीपणा आणि छोटेछोटे विनोद करण्याची खुबी सर्वश्रुत असून, त्याचा ह्या शोला नक्कीच फायदा होईल. अॅण्डटिव्हीवर प्रसारीत होणाऱ्या या शोचे बिग सिनर्जी हे निर्माते आहेत.

Story img Loader