बॉलीवूडमधील सर्वात रोमॅण्टीक ऑनस्क्रिन जोडी असे बिरुद लाभलेल्या शाहरुख-काजोलच्या आगामी ‘दिलवाले’ चित्रपटातील पहिले रोमॅण्टीक गाणे प्रदर्शित झाले आहे. गाण्याला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. युट्युबवर हे गाणे येताच अवघ्या काही तासांत ३० लाखांहून अधिक व्ह्यूज गाण्याला मिळाले आहेत. तर, जगातील एकूण ६२ देशांमध्ये हे गाणे ट्रेंडमध्ये असून गाण्याचे शिर्षक ‘गेरुआ’ हा हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये आहे. शाहरुख-काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’च्या रोमॅण्टीक आठवणी या गाण्यातून पुन्हा ताज्या होतात. गाण्यात शाहरुख-काजोलची रोमॅण्टीक केमेस्ट्री तर पाहायला मिळतेच पण त्यासोबत गाण्यातील लोकेशन्सनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

संगीतकार प्रितम यांनी या गाण्याला संगीत दिले असून गायक अरजित सिंग आणि अंतरा मित्रा यांनी गायले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित दिलवाले हा चित्रपट १८ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटात शाहरुख, काजोलसह अभिनेता वरुण धवन, क्रिती सनोन, जॉनी लिवर, बोमन इराणी आणि संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader