बॉलीवूड किंग शाहरूख खानने श्रीमंतीच्याबाबतीत हॉलीवूड स्टार टॉम क्रुझला मागे टाकण्याचा पराक्रम केला आहे. हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील आघाडीच्या दहा श्रीमंत सेलिब्रिटींची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. जगातील धनाढ्य व्यक्तींचे सर्वेक्षण करणाऱ्या ‘वेल्थ एक्स’ या संस्थेतर्फे ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शाहरूख खान हा एकमेव भारतीय सेलिब्रिटी आहे. क्रिकेट आयपीएलमधील संघाचा मालक असणाऱ्या शाहरूखने ६० कोटी डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. तर हॉलीवूडमधील विनोदी कलाकार जेरी सेईनफेल्ड ८२ कोटी डॉलर्सच्या संपत्तीसह यादीमध्ये अग्रस्थानी आहेत. विशेष गोष्ट म्हणजे हॉलीवूड स्टार टॉम क्रुझ आणि जॉनी डेप यादीमध्ये शाहरूखच्या मागे आहेत. टॉम क्रुझ ४८ कोटी डॉलर्ससह तिसऱ्या तर डेप ४५ कोटींच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहे. तर अन्य सेलिब्रिटींमध्ये जॅक निकोल्सन (४० कोटी डॉलर्स), टॉम हँक्स ( ३९ कोटी डॉलर्स), क्लिंट इस्टवूड (३७ कोटी डॉलर्स), अॅडम सँडलर यांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्वेक्षणासाठी सेलिब्रिटींनी विविध उद्योगांमध्ये केलेली गुंतवणूक आणि त्यांची मालमत्ता ग्राह्य धरण्यात आली होती.

Story img Loader