लतादीदी, रोहीत शेट्टीही करणार मदत
‘कॉमेडी नाईट्स विथ कपील’ या विनोदी कार्यक्रमातून जनतेला खळखळवून हसविणाऱया कॉमेडी किंग कपील शर्माच्या मदतील अवघे बॉलीवूड धावून आले आहे. बुधवारी कपीलच्या या कार्यक्रमाच्या सेटला आग लागून संपूर्ण सेट भस्मसात झाला. ही बातमी कळताच कपीलला बॉलीवूड किंग शाहरूख खानने मोबाईलवरून संपर्क साधला व मदत करण्याचे आश्वासन दिले.
कपील म्हणाला, “या घटनेनंतर मला पाठिंबाम्हणून अनेकांचे फोन येत आहेत. शाहरूख, लतादीदी, रोहीत शेट्टी यांनी मला स्वत:हून फोन करून कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास निसंकोच विचारण्यास सांगितले. संपूर्ण बॉलीवूड एका कुटुंबासारखे माझ्या पाठीशी उभे आहे.”
शाहरूख आणि रोहीत शेट्टी यांनी फोनवर कपीलला आधार देत ‘आम्ही तुझ्या सोबतच आहोत. सांग किती दिवसांत सेट उभा करायचा आहे? अशा सकारात्मक विचारातून पाठिंबा दर्शविला आहे.
बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी कपील शर्माच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपील’ या कार्यक्रमाच्या सेटला अचानक आग लागली. त्यात संपूर्ण सेटचे नुकसान झाले आहे. सुदैवाची बाबम्हणजे यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. तरी सेटचे एकूण २२ कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. आगीचे कारण अद्याप कळलेले नसून शॉटसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीसांची तपासणी सूरू असल्याचेही कपीलने सांगितले.

Story img Loader