बॉलिवूडमधल्या सुपरहिट कलाकारांना हॉलिवूडची दारं आपसुक खुली होतात हे जणू ठरलेलंच आहे. मात्र ‘किंग खान’ म्हणजेच शाहरुखच्या नशीबी हा योग अद्यापही जुळून आला नाही. शाहरुखच्या पाठून इण्डस्ट्रीत आलेल्या ऐश्वर्या, दीपिका, प्रियांकानं हॉलिवूड चित्रपटातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र शाहरुखला हॉलिवूडची पायरी काही चढता आली नाही. ‘हॉलिवूड हे माझ्यासाठी आकाशातल्या चंद्राप्रमाणे आहे ज्याच्याकडे मी रोज पाहतो, पण त्या चंद्राकडे काही केल्या मी पोहोचू शकत नाही’ असं तो म्हणतो.

नुकतंच शाहरुखला हॉलिवूडमध्ये त्याच्या प्रवेशबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी शाहरुखनं अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली. आता हॉलिवूडनं माझ्याकडे पाहायला हवं. ओमपुरींपासून ते प्रियांका चोप्रापर्यंत सगळ्यांनी हॉलिवूडमध्ये काम केलंय. पण मला काही हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळालीच नाही. कदाचित हॉलिवूडसाठी मी योग्य नसेल अशी प्रतिक्रिया शाहरुखनं एका मुलाखतीत दिली आहे. तसेच हॉलिवूडमध्ये काम करण्याइतकं माझं इंग्रजी चांगलंही नसेल अशी मजेशीर प्रतिक्रियाही त्यानं दिली आहे.

बॉलिवूड कलाकारानं हॉलिवूडमध्ये काम करण्यापेक्षा एखाद्या हॉलिवूड कलाकारानं हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा दर्शवली तर मला जास्त आवडेल असंही शाहरुख म्हणाला. सध्या शाहरुख त्याच्या आगामी ‘झिरो’ चित्रपटात व्यग्र आहे. येत्या वर्षाअखेर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Story img Loader