ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार खुशवंत सिंग यांच्या मृत्युनंतर बॉलीवूडमधील शाहरूख खान, पूजा भट्ट, शेखर कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
ओह नो, खुशवंत सिंग आता आपल्यात नाहीत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यामुळे आपल्यासारख्यांची आयुष्य समृद्ध झाली असल्याच्या भावना शाहरूख खानने ट्विटरवरून व्यक्त केल्या.

‘सत्य, प्रेम आणि थोडासा द्वेष’  अशाच काही शब्दांत खुशवंत सिंग यांच्या आयुष्याचे वर्णन करता येईल. माणसाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची दुर्मिळ  क्षमता खुशवंत सिंग यांच्यात होती. – मधुर भांडारकर

खुशवंत सिंग यांचे आयुष्य खरोखर प्रेरणादायी होते. खुशवंत सिंग यांच्या लिखाणाने मानवी आयुष्याच्या जगण्याचा परिघ ख-या अर्थाने विस्तारला तसेच जगण्यातील ख-या आनंदाची जाणीव करून दिल्याचे अभिनेत्री पूजा भट्टने ट्विटरवर म्हटले आहे.

एका व्यक्तीने नव्हे तर संस्थेने आपला कायमचा निरोप घेतला आहे. ‘येतो आता’, हा त्यांनी आपल्यावर केलेला अखेरचा विनोद होता. – शेखर कपूर

लिखाणाच्या माध्यमातून सत्याची, विनोदाची आणि थोड्याश्या द्वेषाची देणगी दिल्याबद्दल खूप धन्यवाद- संध्या मृदूल

पुस्तकांच्या कपाटातील नेहमीच स्मरणात राहणा-या तुमच्या पुस्तकांच्या रूपाने चाहत्यांच्या मनातील कोप-यात सदैव तुमची आठवण राहील.- नेहा धूपिया

आपल्या देशाचा शब्दरूपी ठेवा आपण आज गमावला आहे. बाहेर पडा आणि खुशवंत सिंग यांचे पुस्तक विकत घ्या. कदाचित तुमचं आयुष्य बदलून जाईल.- वीर दास (अभिनेता)

Story img Loader