बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहरुख हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याते दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. पठाण या चित्रपटातून शाहरुख बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटानंतर शाहरुख राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. याची घोषणा शाहरुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहरुख राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटांच्या पोस्टरकडे बघत उभा असल्याचे दिसते. तितक्यात तिथे येतात आणि शाहरुखला विचारतात “काय बघतोयस? त्यावर शाहरुख राजकुमार यांच्या ‘पीके’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटांची स्तुती करतो. त्यानंतर शाहरुख त्याच्यासाठी कोणती स्क्रिप्ट आहे का असा प्रश्न राजकुमार हिरानी यांना विचारतो. त्यावर ते होकारार्थी उत्तर देत, त्यात विनोद आणि ड्रामा भरपूर आहे असे सांगतात. तर शाहरुख विचारतो त्यात रोमांस आहे का? यावर उत्तर देत हिरानी बोलतात, “है सर लेकिन आप ये वाला अॅक्शन अव्हॉईड किजिएगा.” ज्याला शाहरूख उत्तर देत बोलतो, “हाथ ही काट लुंगा में, सर आप बोलो तो.” या चित्रपटाचं नाव ‘डंकी’ आहे असे त्याला या वेळी कळते.

आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video

आणखी वाचा : RRR च्या यशानंतर Jr NTR ने घेतली हनुमान दीक्षा, राम चरण प्रमाणे करणार कठोर महाव्रत

शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल झाला आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. डंकीची पटकथा ही राजकुमार हिरानी, अभिजात जोशी आणि कनिका ढिल्लन यांनी केली आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही राजकुमार हिरानी आणि गौरी खान करत आहेत. तर चित्रपटाचे शूटिंग हे पंजाबमध्ये होणार आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan rajkumar hirani s dunki to release on dec 22 23 taapsee pannu joins cast dcp