अभिनेता शाहरूख खाननं त्याच्या २२ सुपरहिट चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क कोट्यवधी किंमतीला विकले आहेत. शाहरूखचे गेल्या दोन वर्षांत प्रदर्शित झालेले चित्रपट फ्लॉप गेले. त्याचा ‘झिरो’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच आदळला. तुर्त शाहरूख कोणत्याही चित्रपटात काम करत नाही पण त्यानं एका आघाडीच्या खासगी वाहिनीला चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क विकले आहेत. यातून प्रचंड नफा शाहरूखला मिळला असल्याचं समजत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या २२ चित्रपटांमध्ये ‘चमत्कार’, ‘पहेली’, ‘डिअर झिंदगी’, ‘ओम शांती ओम’, ‘फिर भी दिल हे हिंदुस्थानी’, ‘राम जाने’, ‘हॅपी न्यू इअर’, ‘स्वदेश’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटांचा समावेश आहे. हे २२ चित्रपट खासगी वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत. ‘चेन्नई एक्स्प्रेस’नंतर शाहरूखचे कोणतेही चित्रपट सुपरहिट ठरले नाही. डिसेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला त्याचा ‘झिरो’ हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर आदळला होता. शाहरूखचे अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेले चित्रपट आदळले असले तरी त्याच्या जुन्या चित्रपटांची जादू अजूनही कायम आहे. या चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे म्हणूनच चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क विकण्याचा निर्णय शाहरुखनं घेतला आहे.

‘झिरो’च्या अपयशानंतर शाहरूखनं कोणत्याही चित्रपटाची ऑफर अद्याप स्वीकारलेली नाही. अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये शाहरूख दिसणार अशा चर्चा होत्या मात्र शाहरूख या चित्रपटाबद्दल मौन बाळगून आहे. शाहरूख ऐवजी या चित्रपटात विकी कौशलची वर्णी लागू शकते अशा चर्चा आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan sell satellite rights of his 22 films